महाळुंगे, दि. 07 (पीसीबी) : वाहनाच्या धडकेत तरुण जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. ६) दुपारी चाकण-तळेगाव रस्त्यावर घडला. शिवम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवम याच्या आईने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम हा चाकण-तळेगाव रस्त्याने जात असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात शिवम याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर तोंडाला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक पळून गेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.