238 कोटी 43 लाखांच्या कर्जाची 12 टक्के व्याजासह वसुली

0
47

सोलापूर, दि. 07 (पीसीबी) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 238 कोटींच्या बेयकादेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन अधिकारी, एका चार्टड अकाउंटटकडून वसुली करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. तत्कालीन संचालक मंडळातील 35 जणांकडून एकूण 238 कोटी 43 लाख 999 हजाराच्या बेकायदेशीर कर्जाची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यासाठीचे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी जारी केले आहेत.

या आदेशामुळे बँकेचे तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य दिलीप सोपल, विजयसिंह मोहिते पाटील, दीपक आबा साळुंखे, राजन पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, दिलीप माने, बबनदादा शिंदे, संजय शिंदे, रश्मी बागल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना मोठा दणका मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात 2010 साली राजेंद्र राऊत यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर कलम 83 आणि 88 नुसार चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले होते. संचालक मंडळाच्या सदस्यांनी स्वतःच्या संस्थांना कर्ज घेतले. मात्र त्या कर्जाची परतफेड केली नसल्याने बँक अडचणीत आल्याचा ठपका या चौकशी अहवालत ठेवण्यात आला होता.

त्यामुळे या प्रकरणी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळासह अधिकारी आणि चार्टड अकाउंटट यांना देखील जबाबदार धरण्यात आले होते. या चौकशी अहवालनंतर आता विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी कलम 98 अन्वये जबाबदार धरण्यात आलेल्या संचालक मंडळाकडून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत.


कोणाकडून किती वसुली?
दिलीपराव सोपल- 30 कोटी 27,28,122 रुपये

विजयसिंह मोहिते-पाटील- 3 कोटी 05 लाख 54, 242 रुपये

दीपक साळुंखे-पाटील- 20 कोटी 72 लाख 51, 270 रुपये

सुधाकरपंत परिचारक- 11 कोटी 93 लाख 06, 277 रुपये

प्रतापसिंह मोहिते-पाटील- 3 कोटी 14 लाख 65,947 रुपये

राजन पाटील- ३ कोटी ३४,२१,३५७ रुपये

संजय शिंदे – ९ कोटी ८४,४४,७९९ रुपये

बबनराव शिंदे- ३ कोटी ४९,२३,०४१ रुपये

दिलीप माने- ११ कोटी ६३,३४,५६८ रुपये

रणजितसिंह मोहिते-पाटील- ५५ लाख ५४ हजार ६६० रुपये

चांगोजीराव देशमुख- एक कोटी ५१,२१,२२२ रुपये

एस. एम. पाटील- ८ कोटी ७१,८७,६७८ रुपये

चंद्रकांत देशमुख- ८ कोटी ४१,२९,३९९ रुपये

जयवंतराव जगताप- ७ कोटी ३०,०३,५४२ रुपये

रामचंद्र वाघमारे- १ कोटी ४८,६७,५१६ रुपये

सिद्रामप्पा पाटील- १६ कोटी ९९,८०,३९३ रुपये

सुरेश हसापुरे- ८ कोटी ०३,०७,५५९ रुपये

बबनराव अवताडे- ११ कोटी ४४,८१,४१२ रुपये

राजशेखर शिवदारे- १ कोटी ४८,६७,५१६ रुपये

अरुण कापसे- २० कोटी ७४,७८,५१६ रुपये

संजय कांबळे- ८ कोटी ४१,२९,३९९ रुपये

बहिरू वाघमारे-८ कोटी ४१,२९,३९९ रुपये

सुनील सातपुते- ८ कोटी ४१,२९,३९९ रुपये

रामदास हक्के- ८ कोटी ४१,२९,३९९ रुपये

चांगदेव अभिवंत-१ कोटी ५१ लाख २१,२२२ रुपये

भर्तरीनाथ अभंग-१ कोटी ५१ लाख २१,२२२ रुपये

विद्या बाबर- १ कोटी ५१,२१,२२२ रुपये

सुनंदा बाबर- १० कोटी ८४,७२,५५९ रुपये

रश्मी दिगंबरराव बागल – ४३ लाख २६ हजार १०९ रुपये

नलिनी चंदेले- ८८ लाख ५८ हजार ६६३ रुपये

सुरेखा ताटे- १ कोटी ५१ लाख २१,२२२ रुपये

सुनीता बागल- १ कोटी ५१ लाख २१ हजार २२२ रुपये

किसन मोटे- ५ लाख रुपये

कें. आर. पाटील- ५ लाख रुपये

संजय कोठाडीया- ९१ लाख १२ हजार ३६९ रुपये

एकूण- 238 कोटी 43 लाख 999 रुपये