भोसरी, दि. 06 (पीसीबी) : मटण का खात नाही म्हणत पाच जणांनी मिळून एका कामगाराच्या डोक्यात दगड घातला. ही घटना बुधवारी (दि. ४) रात्री हवालदार वस्ती, मोशी येथे घडली.
संदीप मच्छिंद्र दुनघव (वय ३३, रा. आळंदी) असे जखमी मजुराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश सस्ते, सुरेश काळे, राजेंद्र सुधाकर गिरमे, दत्तात्रय छबुराव बनसोडे, तुकाराम टेकाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी संदीप यांना ‘तू मटण का खात नाही’ असे म्हणत शिवीगाळ करून डोक्यात दगड घातला. त्यात संदीप गंभीर जखमी झाले. त्यानंतर तू गणेश सस्ते याला शिवीगाळ का करतो म्हणत शिवीगाळ करून मारहाण व दमदाटी केली. आरोपी राजेंद्र याने संदीप यांचा मोबाईल फोन काढून घेतला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.