डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत… योगेश बहल

0
31

राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

पिंपरी, दि. 06 (पीसीबी) : महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे सकाळी ११.३० वा. राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष मा.योगेश मंगलसेन बहल यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बहल म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचे जीवन हे केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण भारतीय समाजासाठी प्रेरणास्त्रोत आहे. बाबासाहेबांनी आपले बहुतांश आयुष्य सामाजिक विषमता, जातीय भेदभाव आणि वंचित वर्गाच्या हक्कांसाठी लढण्यात घालवले. 

बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि त्यांची विचारधारा तसेच आजही त्यांनी समाजासाठी दिलेला बंधुता, समानता, एकात्मतेचा संदेश चिरंतनकाळ प्रेरणास्त्रोत म्हणून राहील, अशा महामानवाला आपण सर्वजण महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहतो. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, मा.नगरसेवक राजू बनसोडे, बन्सी पारडे, ओबीसी अध्यक्ष विजय लोखंडे, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष ॲड सचिन औटे, महिला कार्याध्यक्षा कविताताई खराडे, असंघटीत कामगार अध्यक्ष रविंद्र ओव्हाळ, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, झोपडपट्टी विभाग अध्यक्ष संतोष निसर्गंध, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, उद्योग व व्यापार अध्यक्ष श्रीकांत कदम, युवक कार्याध्यक्ष तुषार ताम्हाने, प्रसन्ना डांगे, उपाध्यक्ष गोरोबा गुजर, संदिपान झोंबाडे, ख्रिश्चन सेल अध्यक्ष डॅनियल दळवी, उपाध्यक्ष बापू कातळे प्रदीप गायकवाड, सामाजिक न्याक विभाग कार्याध्यक्ष यश बोथ, सामाजिक न्याय उपाध्यक्ष कुमार कांबळे, सरचिटणीस अभिजीत आल्हाट, विनय शिंदे, रवींद्र सोनवणे, निखिल सिंह, राजू चांदणे, झहीर (छोटू) खान, जावेदभाई जकाते, सचिन वाल्हेकर नीलम कदम, श्रीनिवास बिराजदार, सतीश सूर्यवंशी, विराज बनसोडे, कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.