पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी खातेधारकांना एटीएमचा वापर शक्य

0
53

नवी दिल्ली, दि. 06 (पीसीबी) : केंद्र सरकार पॅन कार्डनंतर आता ईपीएफओमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे. केंद्राकडून ईपीएफओच्या सबसक्राइबर्सना नवे लाभ देण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो. केंद्र सरकार ईपीएफओ 3.0 अपडेट आणण्याच्या तयारीत आहे. यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे पैसे काढताना येणाऱ्या अडचणी कमी होतील.

मिळालेल्या माहितीनुसार, ईपीएफओ 3.0 मध्ये कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 12 टक्क्यांपेक्षा रक्कम ईपीएफमध्ये गुंतवता येणार आहे. तसेच, पीएफ खात्यातील रक्कम काढण्यासाठी खातेधारकांना एटीएमचा वापर करता येईल, अशी सुविधा देखील नव्या अपडेटमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

पीएफ खात्यात कर्मचाऱ्यांना योगदान देण्याची मर्यादा वाढवली जाऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम पीएफमध्ये जमा करावी लागते. यामुळे कर्मचारी त्यांच्या क्षमतेनुसार योगदान देऊ शकतात. या नवीन बदलामुळे एखादा कर्मचारी पीएफ

केंद्र सरकार डेबिट कार्ड प्रमाणेच एक स्मार्ट कार्ड पीएफ खात्याशी संबंधित जारी करू शकते. याच स्मार्ट कार्डचा वापर करुन पीएफ खात्यातील रक्कम काढता येईल. पीएफ खात्यातील एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढण्याचा पर्याय दिला जाऊ शकतो. 2025 जूनमध्ये हा बदल होण्याची संभावना आहे.

कर्मचाऱ्यांना देखील कोणताही व्यवहार सोप्या प्रक्रियेनं करता यावा, यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. ईपीएफओ 3.0 च्या सुधारणा दोन टप्प्यात केल्या जाऊ शकतात. ईपीएफओ 2.0 नुसार सुधारणा डिसेंबर 2024 मध्ये पूर्ण केल्या जाणार आहेत. ईपीएफओ 3.0 जून 2025 मध्ये पूर्ण होऊ शकेल, अशी माहिती समोर आली आहे.