भोसरी, दि. 05 (पीसीबी) : पतीचा पाय दुखत असल्याने उपचारासाठी गावी नेण्याबाबत पतीच्या भावाला पत्नीने फोन केला. त्या कारणावरून पतीने पत्नीवर खुनी हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 4) सकाळी मोशी येथे घडली.
जावेद मधू पठाण (वय 40, रा. मोशी) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी जावेद याच्या पत्नीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद याचा उजवा पाय मागील तीन दिवसांपासून दुखत आहे. पायाचे दुखणे वाढत असल्याने त्याला उपचारासाठी मूळ गावी शिंदेवाडी जुन्नर येथे घेऊन जाण्याबाबत जावेद याच्या भावाला त्याच्या पत्नीने फोन केला. या कारणावरून जावेद याने पत्नीला बॅट आणि फरशीने मारून गंभीर जखमी केले. तसेच जावेद याने भावाच्या पत्नीला देखील बॅटने मारून जखमी केले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.