सावधान…घोणस या अतिविषारी सापाच्या मिलनाचा काळ

0
32

मुंबई, दि. 05 (पीसीबी) :  सध्या घोणस या अतिविषारी सापाच्या मिलनाचा काळ असल्याने हे सर्प अडगळीच्या ठिकाणांमधुन बाहेर पडतात. हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासुन स्वत:च्या शरीराचे तापमान वाढविण्यासाठी ऊब मिळवण्यासाठी ऊनाला येवून बसतात.शेणखताजवळच्या ऊबेला किंवा बाथरूमच्या पाईपमधुन,दाराच्या फटीतुन ऊबदार घरात हे सर्प शिरण्याची शक्यता याकाळात जास्त असते.त्यामुळे या कालावधीत यांच्या बाहेर पडण्याने सर्पदंश होण्याच्या प्रमाणात विलक्षण वाढ होते.बागकाम करणार्‍या बागप्रेमींनी,शेतात काम करणार्‍या शेतकर्‍यांनी तसेच निसर्गभ्रमंती करणार्‍या हौशी नागरिकांनी व गिर्यारोहकांनी आपली स्वत:ची विशेष काळजी घेणे खुप गरजेचे आहे.अडगळीच्या ठिकाणी काम करताना अथवा फिरताना पायात घोट्यापेक्षा जास्त उंचीचे बुट वापरावेत, अडगळीच्या ठिकाणी थेट हात न घालता काम करताना त्याठिकाणी लांब काठी फिरवुन घ्यावी,जेणेकरून हालचाल झाल्याने तिथले सरपटणारे प्राणी तिथुन दुर निघुन जातील.खिडकी दार बंद केल्यावर फट राहणार नाही याची काळजी घ्यावी,बाथरूमच्या पाईपला जाळी बसवलेली असावी.

मांजरांची नजर अतिशय तिक्ष्ण असते.त्यामुळे मोकळ्या शेतात,रानात घर असणार्‍यांनी मांजर पाळणे खुप फायद्याचे ठरते मांजर अशा सरपटणार्‍या प्राण्यांबद्दल आपणास कळत-नकळत सावधान करते,त्यामुळे पुढील अनर्थ टाळता येतात.या सापाचा मुख्य नैसर्गिक शत्रू म्हणजेच मुंगुस त्याच्यामुळेही घोणसची संख्या नियंञणात येते. पाठीवर असणार्‍या बदामी आकाराच्या एकसारख्या नक्षीवरून हा सर्प चटकन ओळखता येतो,कोणाला जर या सर्पाचा दंश झालाच तर कुठेही कसल्याही प्रकारे वेळ न दवडता रूग्णास त्वरीत नजीकच्या तालुका सरकारी दवाखाण्यात दाखल करावे व अॅन्टीवेनम प्रतिविषाची लस घेण्यास प्राधान्य द्यावे. जेवढ्या कमी वेळेत ही लस घेतली जाते तेवढे रूग्णाचे प्राण वाचण्यास व रूग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.

भारतात विषारी सर्पांचे जे जे मुख्य प्रकार सर्वञ आढळुन येतात त्या सर्वांची मिळुन एकच ॲंटीवेनम प्रतिविषाची लस सरकारी दवाखाण्यांमध्ये आता उपलब्ध करून दिलेली असते. त्यामुळे कुठल्याही विषारी प्रजातीच्या सर्पाचादंश झाला तरी ती एकच लस रूग्णास दिली जाते. म्हणुनच सर्पदंशानंतर सापाच्या प्रजातीची ओळख पटवण्यासाठी सापाला शोधण्यात,त्याचे फोटो सोबत घेण्यात किंवा त्याला मारून सोबत घेण्यात आपला वेळ आजिबात वाया घालवु नये. NAJA हे होमिओपॅथी औषधाचे दोन थेंब सर्पदंश झालेल्या रूग्णाच्या जीभेवर ठेवल्यास रूग्ण बरा होतो अशी FAKE POST (खोटी पोस्ट) सोशल मेडियावरून वारंवार व्हायरल होत असते. परंतु NAJA हे होमिओपॅथि औषध हृदयरोगासंबंधीच्या काही आजारांसाठी बनवले गेलेले आहे. सर्पदंशाचा व NAJA या औषधाचा तसा तिळमाञ संबंध नाही. सर्पविष रूग्णाच्या हृदयावरही परिणाम करत असल्याने सर्पदंश झालेल्या रूग्णास या NAJA औषधाचा थोडाफार फायदाही होवु शकतो पण रूग्णाचे प्राण वाचविण्यासाठी फक्त आणि फक्त प्रतिविषाची लस लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे. सर्पावरील प्रतिविषाची लस सर्पदंश झालेल्या रूग्णास वेळेत मिळावी यासाठी प्रत्येक शासकीय तालुकारूग्णालयात ती उपलब्ध करून ठेवणे आता बंधनकारक केलेले आहे,तरीही एक सामाजिक बांधिलकी म्हणुन आपण आपल्या तालुका रूग्णालयाशी कृपया संपर्क करून उपलब्धतेबाबत जरूर खाञी करून घ्यावी..!

घोणस सापाची ही प्रजाती आपले अंडे निसर्गात न सोडता आपल्या शरिराच्या ओटीपोटातच उबवते त्यामुळे इतर सर्पांच्या तुलनेत घोणसचा जन्मदर व पिल्ले जगण्याचा दर यामध्ये खुप कमी तफावत असते त्यामुळे एकावेळी अनेक सुदृढ पिलांचा जन्म होतो या सर्पाचे नुकतेच जन्मलेले पिल्लूही प्रौढ सर्पाइतकेच विषारी असते त्यामुळे लहान पिल्लापासुनही सावध रहाणे