महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं…..

0
27

मुंबई, दि. 03 (पीसीबी) : महायुतीच्या नेत्यांनी आज आझाद मैदानाची पाहणी केली. शिवसेनेकडून संजय शिरसाट, गुलाबराव पाटील उपस्थित होते. याआधी भाजप नेत्यांनी आझाद मैदानची पाहणी केली. त्यावेळी शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यातून जनतेमध्ये चुकीचा संदेश जात असल्याच म्हटलं होतं. पाच तारखेला संध्याकाळी आझाद मैदानात महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी आज भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली. यात भाजपकडून गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे शिवसेनेकडून संजय शिरसाट, गुलाबराव पाटील तर एनसीपीकडून असं मुश्रीफ आणि अनिल भाईदास पाटील उपस्थित राहिले.

महायुतीच्या नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. “आज दुपारी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर एक बैठक आयोजित केलेली आहे. ती बैठक घेतल्यानंतर कदाचित आज संध्याकाळी महायुतीचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होऊ शकते” अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.

“आझाद मैदानात शपथ विधी सोहळ्यासाठी आमदारांच्या बैठकीची व्यवस्था कुठे केली आहे? किती गेट आहेत? शपथविधीसाठी ज्यांना निमंत्रित केलय, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एन्ट्री कुठून आहे? या सगळ्याची पाहणी करण्यासाठी आलो होतो” असं संजय शिरसाट म्हणाले. ‘पाच तारखेला पाच वाजता संध्याकाळी एक चांगला सोहळा पहायला मिळेल’ असं संजय शिरसाट म्हणाले.

शिवसेना विरोधी पक्षात बसणार असं टि्वट अंजली दमानिया यांनी केलं. त्यावर शिरसाट म्हणाले की, “कोण अंजली दमानिया?. आम्ही प्रत्येकाला महत्त्व देत नाही” एकनाथ शिंदे विरोध करतायत, त्यामागे दिल्लीतली महाशक्ती आहे असं संजय राऊत म्हणतात, त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, ‘लोकांना कंटाळा येईल एवढं बोलू नका, असा मी राऊतांना मित्रत्वाचा सल्ला देईन’ गुलाबराव पाटील म्हणतात एकनाथ शिंदे यांना एक वर्षांसाठी तरी मुख्यमंत्री करा, ‘या बाबतचा जो काही निर्णय असेल, तो वरिष्ठ घेतील’ मुख्यमंत्री कोण होणार, हे महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट आहे का? ‘याचा निकाल 4 तारखेला संध्याकाळी लागेल’ असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं.