नरेंद्र मोदीमध्ये हिंमत असेल तर मणिपूर फाईल चित्रपट काढा….; संजय राऊतांचं थेट मोदींना इशारा

0
19

मुंबई, दि. 03 (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द साबरमती रिपोर्ट’ हा सिनेमा पाहिला. त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदींना टोला लगवला आहे. उद्या संबल फाईल, मग महाराष्ट्र फाईल असा चित्रपट काढतील..आणि प्रेक्षक हेच बघायला पाठवतील. हिंमत असेल तर मणिपूर फाईल चित्रपट काढा. महाराष्ट्रात संविधानाची हत्या झाली त्यावर चित्रपट काढा, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींना आव्हान दिलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्या एकनाथ शिंदे देखील सिनेमा काढतील. ते फक्त NDA मधील लोकांना चित्रपट बघायला बोलतात. आम्हाला पण चित्रपट बघायला बोलवा. आम्ही पण समीक्षण करू. शरद पवार यांना देखील बोलवा, ते साहित्य संमेलनाचे स्वागाध्यक्ष आहेत, असंही संजय राऊत म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना साबरमती एक्सप्रेस च्या एस-6 कोचमध्ये लागलेल्या घटनेवर आधारित आहे. गोध्रा इथं झालेल्या या दुर्घटनेत 59 जणांचा बळी गेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट नवी दिल्लीतील बालयोगी ऑडिटोरियम इथं पाहिला. मोदी यांनी याआधीच या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मैसी हा प्रमुख भूमिकेत आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट 15 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे.

ज्या पद्धतीने राज्यात सरकार स्थापनेचा गोंधळ सुरू आहे. तो एक प्रकारे अराजकता आहे. एवढं बहुमत मिळाल त्यावर लोकांचा विश्वास नाही. अनेक गावात फेरमतदान आणि मतमोजणीची मागणी होत आहे. माळशिरस तालुक्यात मरकडवडी गावात आज बॅलेटवर मतदान होत आहे. लोकांना ईव्हीएमवर संशय आहे. 10 दिवस झाले तरी हे बहुमताचे सरकार राज्यपालांकडे जात नाहीत. पण अस असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष शपथविधीची तारीख सांगतात. तिकडे मंडप घातला जातोय. आम्ही असतो तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असती, असं संजय राऊत म्हणालेत.