वाहनाच्या धडकेत कामगाराचा मृत्यू

0
29

कामशेत, दि. 02 (पीसीबी) : बाजार करून घराकडे पायी निघालेल्या कामगार तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 1) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास कामशेत येथे घडला.

कमलेष सुखडी राम (वय 25, रा. वेट अँड जॉय वॉटर पार्क लेबर कॅम्प, कामशेत. मूळ रा. झारखंड) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमलेश हा कामशेत येथील वेट अँड जॉय वॉटर पार्क मध्ये काम करत होता. रविवारी कमलेश त्याच्या सहकारी कामगारांसोबत कामशेत येथे बाजारासाठी गेला होता. सायंकाळी चार वाजताच्या सुमारास बाजार घेऊन तो घराकडे निघाला. त्यावेळी त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामशेत पोलीस तपास करीत आहेत.