आळंदी दि. 02 (पीसीबी) : येथील आळंदी कार्तिकी यात्रा श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोडल्याचे सांगता दिनी आळंदीत श्रींची छबिना मिरवणूक होत असते. त्या पूर्वी पालखी मार्गाची स्वच्छता करण्यासाठी वारकरी सेवा संघाचे वतीने विविध सेवा भावी संस्थांचे सहकार्याने आळंदीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात भारत सरकारच्या एन.पी.सी.आय.एल. मुंबई येथील ५० कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त पणे स्वच्छता अभियान मध्ये आपला सहभाग घेत अभियाना अंतर्गत मंदिर परिसर, इंद्रायणी घाट येथे प्रामुख्याने स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमास एन.पी.सी.आय.एल. व्यवस्थापन, स्थानीय लोकाधिकार समिती मुंबई यांचे सहकार्य तसेच वारकरी सेवा संघ (महाराष्ट्र), अध्यक्ष राजाभाऊ चोपदार यांनी मार्गदर्शन केले.
रविवारी ( दि. १ ) आळंदीत दुपारी तीन ते साडे पाच यावेळेत वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर , मुळशी , पिंपरी चिंचवड, भोर , पुणे शहर, ,पुरंदर, तालुक्यातील वारकरी सेवक तसेच आळंदीतील स्वकाम सेवाभावी स्वच्छता संस्था, आळंदी नगरपालिका, आळंदी देवस्थान, भाभा न्युक्लिअर पाॅवर सेंटर , मुंबई चे स्वच्छता दुत , स्थानिक वारकरी, स्वच्छता उपक्रम राबविणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचे वतीने इंद्रायणी नदी घाट परिसर, महाद्वार, संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. वारकरी सेवा संघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ चोपदार यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाने हा उपक्रम आयोजित झाला. यावेळी पंढरपूर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त अॅड. माधवीताई निगडे, देहु संस्थानचे माणिक महाराज मोरे, गाथा मुर्ती रामभाऊ महाराज राऊत, राम महाराज झिंजुर्के , जिल्हाध्यक्ष संजय बोरगे, नरहरी महाराज चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बारवकर, ओंकार महाराज वैद्य, आदींसह वारकरी सेवा संघ, सांप्रदायातील पदाधिकारी, सदस्य, सेवा संघ बारामती तालुका अध्यक्ष दत्तात्रेय गावडे, उपाध्यक्ष सतीश गावडे , उपाध्यक्ष जगन्नाथ जगताप , सचीव दत्तात्रेय भोसले, निखिल कदम, बारामती शहर अध्यक्ष सचीन गवारे, अरविंद फरांदे महाराज,अशोकराव कदम, गणेश शिंदे, श्रीकांत झोरे, शहर सदस्य, तालुका सदस्य आदी उपस्थित होते.
सर्वांचे सहभागातून आंळदी तिर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. ज्ञात – अज्ञात सर्वच वारकरी सेवकांचे, सेवाभावी संस्था, आळंदी देवस्थान, आळंदी नगरपालिका आरोग्य -स्वच्छता विभाग यांचे वारकरी सेवा संघ पुणे जिल्हा, बारामती आणि सर्व तालुका,पुणे शहर , पिंपरी चिंचवड शहर या सर्वांच्या वतीने अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे संयोजन तर्फे आभार व्यक्त करण्यात आले.