काळेवाडी मध्ये दोन दुचाकींची धडक

0
36

काळेवाडी, दि. 1 (पीसीबी) :

काळेवाडी मधील एमएम चौकात दोन दुचाकींची जोरात धडक झाली. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा गुडघा फ्रॅक्चर झाला आहे. ही घटना 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली.

सर्जेराव रंगराव पाटील (वय 57, रा. काळेवाडी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील हे त्यांच्या दुचाकीवरून ज्योतिबा गार्डनकडे जात होते. एम एम चौकातून उजवीकडे वळत असताना एम्पायर इस्टेट कडील बी आर टी मधून आलेल्या एका दुचाकीने (एमएच 14/केके 6374) पाटील यांना जोरात धडक दिली. यामध्ये पाटील यांचा गुडघा फ्रॅक्चर झाला आहे. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.