पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित असणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ जुन्या जागेवरचं होणार

0
5

सासवड, दि. 28 (पीसीबी) : पुरंदर तालुक्यातील विमानतळ हे भूसंपादनाचे एक मॉडेल आहे. ते विमानतळ प्रस्तावित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळ असून ते जुन्याच जागी म्हणजे पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाची वाडी, वनपुरी, एखतपुर आणि कुंभार वळण या गावाच्या हद्दीमध्ये होणार आहे.

पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्येच 2 हजार 832 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. केंद्र आणि राज्य सरकार तसेच एअरपोर्ट, थॉरिटी संरक्षण मंत्रालयाने त्या जागेसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. आत्तापर्यंत भूसंपादन कोणी करायचे आणि भूसंपादनासाठी मोबदला काय द्यायचा, यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. विमानतळाच्या भूसंपादनासाठी 5000 कोटी रुपये लागणार आहे. जागेचे भूसंपादन हे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी की एमआयडीसी साठी यांनी करावयाचा यावर देखील चर्चा होऊन, अंतिम निर्णय होणे, बाकी आहे.

तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुरंदर हवेलीच्या आमदारांनी सांगितले आहे की, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हे विमानतळ एकतर्फी होणार नाही.