गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांचा पराभव

0
4

मुंबई, दि. 27 (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या बरोबर शिवसेना सोडून आलेल्या सर्वांनी विजयी कऱण्याची ग्वाही दिली होती पण, पाच आमदारांची दांडी गूल झाली. सदा सरवणकर, यामिनी जाधव, शहाजीबापू पाटील, संजय रायमूलकर आणि ज्ञानराच चौगुले यांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, मी पडलो तर फाशी घेईल, असे जाहीर वक्तव्य करणारे शहाजी बापू पाटील आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे शब्दाचे पक्के असलेले शिंदे आता या पाच पराभूत निष्ठावंतांना कसा न्याय देणार याची उत्कंठा लागली आहे.

विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा झटका बसला आहे. शिंदे यांनी 2022 मध्ये गुवाहाटीला गेलेल्या सर्वांना निवडून आणले नाही, तर राजकारणातून निवृत्ती घेऊ असे म्हटले होते. शिदे यांच्या शिवसेनेची विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी झाली असली, तरी पाच आमदारांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. यामध्ये सदा सरवणकर, यामिनी जाधव, शहाजीबापू पाटील, संजय रायमूलकर आणि ज्ञानराच चौगुले यांचा समावेश आहे. माहीममध्ये सदा सरवणकर यांचा तिरंगी लढतीत पराभव झाला. शहाजीबापू पाटील यांना सांगोल्यात शेकापकडून पराभव स्वीकारावा लागला. भायखळ्यातून यामिनी जाधव पराभूत झाल्या. बुलढाण्यातून संजय रायमूलकर यांचा पराभव झाला. उमरग्यामध्ये ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला.

लोकसभा निवडणुकित पराभूत झालेल्या भावना गवळी यांनी नंतर स्वतः एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेवर संधी दिली. विधानसभेला उमेदवारी दिली पण त्यांचा पराभव झाला. श्रीमती गवळी यांच्या प्रमाणेच आता विधानसभेतील पाच पराभूत आमदारांना शिंदे हे न्याय देणार की वाऱ्यावर सोडून देणार ते पहायचे.

महायुतीमधील विजयाची तीन कारणे
‘माझी लाडकी बहिण’ योजनेमुळे महायुतीला महिलांची मते मिळाली
महायुतीच्या शिंदे सरकारने जून 2024 मध्ये ‘माझी लाडकी बहिण’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत 2.34 कोटी महिलांना याचा लाभ मिळाला, जे राज्यातील एकूण महिला मतदारांपैकी जवळपास निम्मे आहे. निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘महायुतीची सत्ता आल्यास योजनेंतर्गत दरमहा 2100 रुपये दिले जातील’, असे आश्वासन दिले होते. अनेकांनी त्याचे कौतुक केले.

संघ मैदानात उतरला, सभा घेतल्या आणि भाजपसाठी मते मागितली
लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजप आणि संघाचे संबंध बिघडत असल्याच्या अनेक बातम्या येत होत्या. निकालात भाजप 240 जागांवर घसरला. या निकालाचा संबंध आरएसएस आणि भाजपमधील बिघडत चाललेल्या संबंधांशी असल्याचे दिसून आले. यानंतर हरियाणाच्या निवडणुकीत संघाने मजल मारली आणि भाजपने 48 जागा जिंकून हॅटट्रिक केली. महाराष्ट्रातही भाजपची मते मागण्यासाठी संघ मैदानात उतरला.

लोकांना पटवून देण्यात महाविकास आघाडी मागे पडली
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान, अदानी आणि आरक्षण हे मुद्दे केले होते. लोकसभा निवडणुकीत भाजप 240 पर्यंत घसरला आणि काँग्रेसने आघाडीसह 99 जागा जिंकल्या, परंतु महाराष्ट्रात हे मुद्दे फेल ठरले आहेत.