सोन्याच्या झुमक्यासाठी चोरट्यांनी महिलेचा कान कापला

0
4

पुणे, दि. 27 (पीसीबी) : शिरूर तालुक्यातील गुणाट येथे असणाऱ्या करपे वस्ती परिसरात चार जणांनी दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांनी एका महिलेचा कान धारदार शस्त्राने कापून तिच्या कानातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ऐवज मारहाण करून चोरून नेला. या घटनेमुळे शिरूर तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचे पती पायी वारीसाठी आळंदी येथे गेले असताना हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोपान करपे यांनी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोपान करपे हे पत्नी सुमन, मुलगा राजेंद्र, सून कल्पना, मुलगा आत्माराम, सून ज्योती आणि नातवंडांसह गुनाट गावातील करपे वस्ती येथे राहतात. शेती करुन कुटुबांची उपजीविका ते चालवतात. सोपान करपे हे आळंदी येथे पायी वारी करण्यासाठी गेले होते. २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांच्या पत्नी सुमन या खोलीमध्ये एकट्याच दरवाजा ओढून झोपल्या होत्या. तसंच शेजारच्या खोलीत त्यांची दोन मुले झोपली होती.

मध्यरात्री दीजच्या सुमारास तोंडाला काळे मास्क लावलेल्या चार अज्ञात व्यक्ती घरात शिरल्या. त्यांनी अचानक सुमन करपे यांच्या तोंडावरील पांघरुन काढले. त्या चार जणांना पाहून सुमन यांनी ओरडण्यास सुरुवात केली. मात्र त्यातील एकाने सुमन यांचे तोंड दाबले आणि त्यांना हाताने आणि लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. तसंच जबरदस्तीने त्यांच्या गळ्याला चाकू लावत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून घेतले. मात्र, कानातील सोन्याचे झुमके आणि वेल काढता येत नसल्याने चोरांनी कोणत्या तरी धारदार हत्याराच्या साहाय्याने त्यांचे दोन्ही कान खालील बाजुने कापून झुमके आणि वेल काढून घेतले. तसंच पेटीतील तीन हजारांची रोख रक्कम चोरी घेऊन ते पसार झाले.

मुलांना मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला. सुमन करपे या मुलांकडे गेल्या असता त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी लावली होती. त्यांनी ती कडी काढली आणि मुले आणि सुना बाहेर आल्या. त्यांनंतर मुलांनी राजेंद्र आणि आत्माराम त्यांनी सुमन यांना औषधोपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.