ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या वृद्ध महिलेचा अपघात

0
41

आळंदी, दि. 27 (पीसीबी) : श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या एका वृद्ध महिलेला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही घटना आळंदी मधील घुंडरे आळी चौकात घडली. यामध्ये वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 25) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.

राधाबाई किसन वाळुंज (वय 60, रा. आव्हाट, ता. खेड) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राधाबाई या श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी पायी चालत जात होत्या. आळंदी मधील घुंडरे आळी येथे त्यांना पाठीमागून एका वाहनाने धडक दिली. वाहनाचे चाक राधाबाई यांच्या उजव्या पायावरून गेले. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.