पुणे, दि. 26 (पीसीबी) : मराठी सिनेइंडस्ट्री तसंच बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे. परंतु हा सिनेमा आता वादात अडकला असून पुणे कोर्टानं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स पाठवले आहेत. कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे समन्स बजवण्यात आले आहेत. त्यामुळं सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच वादात अडकला असून नागराज मंजुळे यांच्याची अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
नागराज यांच्या खाशाबा सिनेमाची कथा वादात सापडली आहे. या सिनेमाची मूळ कथा ही लेखक संजय दुधाणे यांची असल्याचं समोर आलं होतं. याच संदर्भात दुधाणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. संदय दुधाणे यांनी नागराज मंजुळे तसंच जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन आणि ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. याच प्रकरणी कोर्टानं नागराज यांना समन्स पाठवलं आहे.