निगडी, दि. २४ (पीसीबी) : बेकायदेशीरपणे गृह अतिक्रमण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना यमुना नगर निगडी येथे घडली.
मानसिंग बाबासाहेब खरात, त्रिदेव मानसिंग खरात आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निडो होम फायनान्सचे अधिकारी गणपत कवठेकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी नीडो होम फायनान्स कंपनीकडून गृह कर्ज घेतले होते. ते वेळेत परत न केल्याने कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सदनिका सील केली. त्यामध्ये आरोपींनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले. याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.










































