काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय

0
4

साकोली, दि. २४ (पीसीबी) : नुकत्याच पार पडलेल्या साकोली विधानसभेच्या मतमोजणीत अखेरच्या क्षणी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या २०८ मतांनी निसटता विजय झाला विजयानंतर खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या उपस्थितीत विजय रॅली काढण्यात आली

आज सकाळी आठ वाजेपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयात साकोली मतदारसंघाची मतमोजणी सुरू करण्यात आली. यात काँग्रेस व भाजप यांच्या चुरशीची लढत झाली. अखेरच्या क्षणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अवघ्या २०८ मतांनी निसटता विजय झाला. यावेळी साकोली मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे अविनाश ब्राह्मणकर राहिले तर तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार डॉक्टर सोबत करंजकर यांना मते मिळाली. या मतमोजणीसाठी सकाळपासून तहसील कार्यालय परिसरात पोलिसांचा चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसील कार्यालयासमोर निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत होती. सायंकाळी सहा वाजे दरम्यान निकाल घोषित करण्यात आला. यात नाना पटोले विजय झाल्याची घोषणा करण्यात आली. घोषणा आल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयी रॅली काढली या रॅलीमध्ये खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे समाज कल्याण सभापती मदन रामटेके काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अश्विन नशिने, इंजिनियर संदीप बावनकुळे, विजय दुबे, नईम अली यांच्यासह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मात्र आमदार नाना पटोले उपस्थित नव्हते

फेर मतमोजणीची मागणी फेटाळली

विजयाची घोषणा झाल्यानंतर माजी खासदार सुनील मेंढे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे भाजपाचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अश्विनी माजे यांनी फेर मतमोजणीची मागणी फेटाळली.