राज्यात पुन्हा भाजपच, फडणवीस यांना मोठी संधी

0
88

मुंबई, दि. 20 (पीसीबी) : महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. आता निवडणूक आयोगाकडून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. त्याआधी MATRIZE चे एक्झिट पोल समोर आले आहेत. MATRIZE च्या एक्झिट पोलनुसार, राज्यात महायुतीचं सरकार येईल असं समोर आलं आहे. राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजपला-महायुतीला १५० ते १७० जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीला राज्यात ११० ते १३० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच इतरसाठी ८ ते १० जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोणाला किती जागा मिळणार?
MATRIZE च्या पोलनुसार, महायुतीमधील भाजपला सर्वाधिक ८९ ते १०१ जागा मिळू शकतात. तर शिंदे गटाला ३७ ते ४५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला १७ ते २६ जागा मिळू शकतात. तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला २१ ते २९ जागा, काँग्रेसला ३९ ते ४७ जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला ३५ ते ४३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळाण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच दोन मोठे पक्ष दोन गटात विभागले गेले. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या कांटे की टक्कर पाहायला मिळेल. यंदाची निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे.