मुंबई, दि. १८ : शेअर बाजारात टाटा म्हणजे अशी ख्याती आहे. देशांतर्गत बाजारात सूचिबद्ध टाटा ग्रुपच्या अनेक शेअर्सनी आजवर गुंतवणूकदारांना भरमसाठ परतावा दिला असून अजूनही काही शेअर्स मल्टीबॅगर परताव्याच्या दिशेने अग्रेसर आहेत. तसेच सध्याच्या बाजारातील घसरणीचा तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि दर्जेदार शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे असतील तर टाटा ग्रुपच्या शेअर्सपेक्षा चांगले काय असू शकते.
देशांतर्गत बाजारातील चढ-उतारात टाटा समूहाचे अनेक समभाग उच्चांकावरून सुमारे ३४% पर्यंत खाली व्यवहार करत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बाजारातील घसरणीमुळे टाटा मोटर्स, टाटा कंझ्युमर, टाटा स्टील, टाटा केमिकल आणि इतर समूह कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय घट झाली. अशा स्थितीत टाटा ग्रुपचे वरील बडे शेअर्सचे मूल्यांकन कमी झाले असून या समभागांची सध्याची किंमत काय आहे आणि त्यांच्या उच्चांकावरून किती टक्क्यांनी घसरले आहेत जाणून घेऊया.
टाटा मोटर्स
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सचे शेअर्सचा उच्चांक १,१७९ रुपये आहेत तर सध्याची किंमत ७७४ रुपयांच्या आस्पासन आहे. या स्थितीत टाटा मोटर्सचे शेअर्स उच्चांकावरून ३४% आपटले आहेत.
टाटा एलेक्सी
टाटा समूहाचा हा शेअर ९,०८० रुपयांच्या उच्चांकावरून ६,३७४ रुपयांवर घसरला असून या शेअरमध्ये जवळपास ३२% पडझड झाली आहे.
टाटा कंझ्युमर: FMCG क्षेत्रातील या टाटा ग्रुप कंपनीचे शेअर्स उच्चांकावरून २६% घसरले असून टाटा कंझ्युमरने १,२४७ रुपयांचा उच्चांक गाठला होता मात्र, आता त्याची किंमत ९२५ रुपये आहे.
टाटा केमिकल : रासायनिक क्षेत्रातील टाटा समूहाच्या या कंपनीचे शेअर्सही उच्चांकावरून २२% घसरले आणि १,२४७ रुपयांच्या उच्च पातळीवरून आता १,०५८ रुपयांवर व्यवहार करत आहे.
टाटा स्टील: भारतातील स्टील क्षेत्रातील दिग्गज टाटा स्टीलचे शेअर्सही घसरणीनंतर मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. टाटा स्टीलचे शेअर्स १७० रुपयांवरून घसरले आणि आता १३८ रुपयांवर व्यवहार करत आहेत.