कुरळी येथे गांजा पकडला

0
4

महाळुंगे, दि. 16 (प्रतिनिधी)

खेड तालुक्यातील कुरुळी येथे महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गांजा पकडला. ही कारवाई शुक्रवारी (दि. 15) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

मायाकौर किशोरसिंग तिलपिते (वय 42, रा. कुरळी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संतोष वायकर यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 42 हजार 300 रुपये किमतीचा 846 ग्रॅम गांजा विक्रीसाठी बाळगला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत गांजा जप्त केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
बुलेटच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
बावधन, दि. 16 (प्रतिनिधी)

बुलेटने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात 13 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास सुस पाषाण रोडवर घडला.

लखोप्पा नुरप्पा राठोड (वय 35, रा. हडपसर, पुणे) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बुलेट (एमएच 10/डीवाय 6216) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड हे सुस पाषाण रोडने दुचाकीवरून जात होते. दरम्यान पाठीमागून भरधाव आलेल्या बुलेटने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये राठोड यांचा पाय फ्रॅक्चर झाला. अपघात झाल्यानंतर बुलेट चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. बावधन पोलीस तपास करीत आहेत.