राहुल कलाटेंचे सोसायट्यांना टँकरमुक्त करण्याचे आश्वासन

0
4

: चिंचवडमध्ये सोसायट्यात भेटीगाठी व बैठका
: चोवीस तास सेवेस तत्पर राहण्याचा दिला विश्वास.

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिंचवड विधानसभेचे उमेदवार राहुल कलाटे यांनी चिंचवड भागातील अनेक सोसायटीत प्रत्यक्ष भेट देऊन संवाद साधला. प्रामुख्याने चिंचवड, रावेत, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क, चिंचवडगाव तसेच पिंपळे गुरव परिसरातील सोसायट्यांचा यात समावेश होता. यावेळी, कलाटे यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि टँकरमुक्त चिंचवड, समस्यामुक्त चिंचवड करण्याचा विश्वास नागरिकांना दिला.

    विधानसभा निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असल्याने, कलाटे यांच्याकडून विविध ठिकाणी वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला जात आहे. सोसायटी धारकांशी संवाद साधण्यापूर्वी कलाटे यांनी चिंचवड गावातील श्री. मोरया गोसावी समाधीस्थळी, प्राचीन धनेश्वर महादेव मंदिरात नममस्तक होत दर्शन घेतले. त्यानंतर, इन्फिनिटी वर्ल्ड, रस्टन कॉलनी, एबीसी यासह परिसरातील रहिवाशी सोसायट्यामध्ये दिवसभर मतदारांच्या भेटीगाठी व बैठका घेतल्या. यावेळी, विविध सोसायटीचे पदाधिकारी, रहिवासी व महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

     सोसायटी धारकांनी सुद्धा कलाटे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करत, आमदारांकडून असलेल्या आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्यात पाणी, वीज, रस्ते अशा मूलभूत सुविधांचा अभाव यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मतदार संघात आजपर्यंत सत्तेतून पैसा आणी पैशातून पुन्हा सत्ता हेच धोरण अवलंबले गेले. मतदारांना गृहीत धरणे, समस्या सोडविण्यास टाळाटाळ करणे असे मुद्दे नागरिकांनी प्राधान्याने मांडले.

कोट
कोणत्याही दहशतीला न जुमानता मतदार बंधू-भगिनीं आपला मतदानाच्या हक्काद्वारे चिंचवडमध्ये यंदा परिवर्तन घडवणार आहेत. ब्लुलाईन मधील घरांचे डेव्हलपमेंट, लाखो अनधिकृत घरे नियमितीकरण व प्राधिकरणातील घरांची मालकी हे प्रश्न मी प्रधान्याने सोडवणार आहे. टँकरमुक्त , समस्यामुक्त चिंचवडचा माझा निर्धार आहे. सर्वांगीण विकास साधण्यासाठी मला संधी द्यावी. – राहुल कलाटे , उमेदवार , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

राहुल कलाटे हे चिंचवड ते हिंजवडी यादरम्यान पाच प्रस्तावित रस्त्यांसाठी भांडत आहेत. प्रदूषण मुक्त पिंपरी चिंचवड शहर करण्यासाठी राहुल कलाटे यांनी पुढाकार घेतला आहे. पवना नदीमध्ये एक थेंबही सांडपाणी जाऊ नये यासाठी राहुल कलाटे आग्रही आहेत. त्यामुळे पर्यावरण आणि मानवतावादी राहुल कलाटे यांना आम्ही निवडून देणार

  • माधव पाटील,
    मुख्य प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,पिंपरी चिंचवड