देवेंद्र फडणवीस यांना गुंतवण्याचा प्रयत्न सचिन वाझे आणि अनिल देशमुखांनी केला-चांदिवाल

0
39

मुंबई, दि. १३ – अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचं टार्गेट दिल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर चांदिवाल समिती नेमण्यात आली. त्या समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला नाही. अनिल देशमुख यांनीही या अहवालाची मागणी केली होती. मात्र हा अहवाल समोर आलेला नाही. अशातच निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांनी गुंतवण्याचा प्रयत्न केला असं चांदिवाल यांनी म्हटलं आहे.

२७ एप्रिल २०२२ ला मी उद्धव ठाकरेंना अहवाल सोपवला होता-चांदिवाल
२७ एप्रिल २०२२ ला मी त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंकडे मी अहवाल सोपवला होता. त्यामध्ये ज्या बाबी मांडल्या आहेत त्या कुठल्याही शासनाच्या पचनी पडणाऱ्या नाहीत. त्यामुळे तो माझा अहवाल सार्वजनिक केला गेला नसावा असं चांदिवाल यांनी म्हटलं आहे. मला शासकीय अधिकाऱ्यांनी पाहिजे तशी मदत केली नाही हे वास्तव आहे, असं चांदिवाल म्हणाले.

परमबीर सिंग यांना समोर आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. आयोगाच्या चौकशीत अडथळे निर्माण केले गेले. आयोगाला गाडी दिली गेली नाही, स्टाफ दिला गेला नाही. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील जागा दाखवली ती अयोग्य दाखवली. शेवटी एक जागा आम्ही निवडली आणि तिथल्या स्टाफला त्रासही झाला. पण हवं तशी मदत आम्हाला त्यावेळच्या सरकारकडून मिळाली नाही. मी माझी नाराजी ही मांडली आहे, उद्धव ठाकरेंना मी हे सांगितलं आहे. मी प्रत्यक्ष भेट घेऊनही त्यांना हे सांगितलं आहे. असंही चांदिवाल यांनी सांगितलं.

अनिल देशमुख, पलांडे, परमबीर सिंग यांना आम्ही दंड भरायला लावला होता. आम्हाला जे शपथपत्र दिलं होतं त्याअनुसार सचिन वाझेंनी साक्षी पुरावे दिले असते तर बराच खुलासा झाला असता. त्यांच्या शपथ पत्रात त्यांनी दोन राजकीय व्यक्तींची नावं घेतली होती. आर्थिक व्यवहारांचाही उल्लेख केला होता. ती नावं होती अजित पवार आणि शरद पवार. मी त्यांना ही नावं रेकॉर्डवर घेणार नाही. नियमांत बसत नसल्याने मी ते रेकॉर्डवर घेतलं नाही. देवेंद्र फडणवीस हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते त्यांनाही गुंतवण्याचा प्रयत्न सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला होता. प्रकरण कुठलं होतं ते मी सांगणार नाही.असं चांदिवाल यांनी स्पष्ट केलं. मी त्यावेळी हे बोललो नाही कारण चर्चा करण्याला कारण मिळतं. राजकीय व्यक्तींना गुंतवून स्वतःची प्रसिद्धी नको होती. त्यामुळे मी त्यावेळी काही बोललो नाही. असंही चांदिवाल यांनी स्पष्ट केलं.

सचिन वाझेंनी राजकीय व्यक्तींची नावं घेतली होती-चांदिवाल
प्रतिज्ञापत्रात सचिन वाझेंनी ज्या राजकीय व्यक्तीबाबत घेतलं होतं ते मी साक्षी पुराव्यांमध्ये घेतलं नाही. ठाण्याचे एक डिसीपी होते ते हस्तक्षेप करायचे. तसंच परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची बैठक झाली ती उघड झाली होती. संबंधित पोलीस अधिकारी-कर्मचारी त्यांना आणण्यासाठी जे कर्मचारी नेमले होते त्यांनाही निलंबित करण्यात आलं. मी असंही ऐकलं आहे की सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांचीही एक बैठक झाली असं चांदिवाल यांनी म्हटलं आहे. चांदिवाल यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे