पार्थ पवार तीन दिवस शहरात तळ ठोकूण

0
34
  • आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर नाराजांशी चर्चा
  • पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे गेली तीन दिवस पिंपरी चिंचवड शहरात तळ ठोकूण होते. पिंपरी राखीव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात नाराज माजी नगरसेवकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना समाजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, असे सांगण्यात आले. दरम्यान, पार्थ पवार यांची शिष्टाई फारसी कामी आलेली नाही, असे समजले
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार बनसोडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्याच बहुसंख्य माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. भाजपचे आमदार उमा खापरे आणि अमित गोरखे यांच्यासह माजी नगरसेवकांनीही पक्षाच्या बैठकित तोच सूर आळवला होता. पक्षाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेल्या योगेश बहल यांनी सुरवातीलाच २७ माजी नगरसेवकांची बैठक घेऊन आमदार बनसोडे यांना उमेदवारी देऊ नये म्हणून जोरदार मागणी केली होती. दहा वर्षे आमदार असताना कुठलेही ठोस काम नाही, लोकांशी संपर्क नाही, पक्षाच्या कुठल्या सभा, मेळावे, बैठकांना किंवा आंदोलनात सहभाग नाही अशा निष्क्रिय व्यक्तीला उमेदवारी नको अशी सर्वांचीच मागणी होती. प्रत्यक्षात अजित पवार यांच्या समोर दुसरा पर्याय नसल्याने निष्ठावंत म्हणून पुन्हा बनसोडे यांनाच उमेवारी मिळाली. विरोधातील वातावरण लक्षात घेऊन पॅचअप करण्याची जबाबदारी पार्थ पवार यांच्यावर येऊन पडली.
  • रविवार पासून मंगळावर पर्यंत तीन दिवस स्वतः पार्थ पवार हे शहरातील नेत्यांना वैयक्तिकरित्या भेटून चर्चा करत आहेत. भाजपचे आमदार अमित गोरखे यांच्यासह राष्ट्रवादीच्या ज्या ज्या माजी नगरसेवकांनी विरोध केला होता त्यांच्या घरी जाऊन सहकार्याची अपेक्षा पार्थ पवार यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. बनसोडे यांच्या प्रचारात बहुसंख्य माजी नगरसेवकाचा सहभाग दिसत नसल्याने राष्ट्रवादीतही अस्वस्थता आहे. नाराज नेते, कार्यकर्ते यांना विनवण्या करूनही प्रत्यक्षात कोणी सक्रीय होत नसल्याने पार्थ पवार हेसुध्दा त्रस्त असल्याचे समजले. चार दिवसांनंतर पुन्हा तीन दिवसांसाठी शहरात तळ ठोकून राहणार असल्याचे सांगण्यात आले. पार्थ पवार यांच्या शिष्टाईला विशेष गांभीर्याने कोणी घेत नसल्याने पक्षातील मोठा घटक चिंतेत आहे.