व्यावसायिकाच्या कार्यालयातून ३६ लाखाची रोकड जप्त

0
15

तळेगाव, दि. ११ (पीसीबी) –

निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी पथकांकडून तपासणी केली जात आहे. शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमाटणे येथे एका स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर छापा टाकून पोलीसांनी ३६ लाख ९० हजार ५०० हजारांची रोकड जप्त केली.

सचिन शाबू मुर्‍हे (रा. सोमाटणे, चौराईनगर) असे रोकड जप्त केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. मुर्‍हे यांचा जमीन खरेदी-विक्री आणि स्टीलचा व्यवसाय आहे. त्यांच्या पत्नी तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायत सदस्या होत्या. तळेगाव दाभाडे पोलिसांना सोमाटणे येथे मुर्‍हे यांच्या कार्यालयात मोठी रोकड असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, तळेगाव पोलीस आणि भरारी पथकामार्फत मुर्‍हे यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत कार्यालयात ३६ लाख ९० हजार ५०० रूपयांची रोकड आढळून आली. मुर्‍हे यांना रकमेबाबत समाधानकारक उत्तर देता न आल्याने रोकड जप्त करण्यात आली. याबाबत निवडणूक विभाग आणि आयकर विभागाला कळविण्यात आले आहे. जप्त केलेली रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित केली आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.