आर्थिक फसवणूक केल्‍याने विवाहितेची आत्‍महत्‍या

0
50

पतीसह पाच जणांवर गुन्‍हा दाखल

रावेत, दि. ८ (प्रतिनिधी)

क्‍युनेट बिझनेसच्‍या नावाखाली दोन महिलांसह चार जणांनी एका विवाहितेची पाच लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. तर फसवणूक झालेले पैसे तू माहेराहून आणले नाहीत, तर तू हे पैसे जुगारात हरली, असे सर्वांना सांगेल, अशी धमकी पतीने देऊन या सर्वांनी तिला आत्‍महत्‍येस प्रवृत्‍त केल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना रावेत येथे घडली.

प्रकाश गजानन देशमुख (वय ३२, रा. सिंधी मेषे आकरे लेआऊट, वार्ड नं. ३, वर्धा) यांनी गुरुवारी (दि. ७) याबाबत रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जळगाव येथील शासकीय नर्सिंग महाविदयालयातील नर्स टिचर, जळगाव, विवेक अवचार (रस्टाफ नर्स) ई. एस. आय. सी. हॉस्‍पिटल, कांदिवली), हायलाइफ सोसायटी, थेरगाव येथे राहणारी महिला आरोपी अनुप वासनिक (रा. वी/१२०२, क्रिसटाईन ट्रोलाईफ, शंकर कलाटे नगर) आणि मयत बहिणीचे पती गुंजल सदाशिव घागरे (रा. नवनीत नगर, वाडी, नागपुर) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. ही घटना १ डिसेंबर २०१९ ते २१ ऑक्‍टोबर २०२४ या कालावधीत अर्बन स्‍काय लाइन, रावेत येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादीची बहिण हिची क्युनेट बिझनेसच्या माध्यमातुन आरोपींशी सोबत ओळख झाली. या सर्वानी मिळून तिच्‍याकडून ५ लाख ४० हजार रुपये घेतले. मात्र हे पैसे परत न देता तिची फसवणूक केली. त्यामुळे तिच्‍या आत्महत्येस ते जबाबदार आहेत. तसेच मयत विवाहितेचा पती घागरे याने तिला पैसे बुडाले कसे, सगळे पैसे तुझया आईकडुन आण, नाहीतर मी तुला घरात ठेवणार नाही. असे सतत बोलुन तिला मानसीक त्रास दिला. बुडालेले पैसे तुझ्या आईकडुन आणले नाहीतर, तु जुगारामध्ये पैसे हरली, अशी तुझी सगळीकडे बदनामी करेल असे बोलुन मारहाण करून व मानसीक त्रास देवुन तिला आत्महत्येस प्रवृत्‍त केले. रावेत पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.