– हिंदू धर्मात कलेला मानाचे स्थान
– संस्कार भारती तर्फे दीपसंध्या २०२४ उत्साहात
– शेकडो कलासाधकांची उपस्थिती
चिंचवड, दि. 06 (पीसीबी) : परकीयांच्या आक्रमणानंतर ही आपली कला, संस्कृती टिकून राहिली आता ती वृद्धिंगत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, हिंदू धर्म आणि संस्कृती मध्ये कलेला विशेष मानाचे स्थान असून कला साधनेतून आपली संस्कृती संवर्धन शक्य असल्याचे मत सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण यांनी मांडले. दीपावली निमित्याने संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीतर्फे शहरातील विविध कलाकारांचे एकत्रीकरण व कला सादरीकरण कार्यक्रम ‘दीपसंध्या २०२४ ‘ येथील प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलतांना सोमण यांनी
कलाकारांनी आपल्या कलेद्वारे आपल्या धर्म व संस्कृती व संस्कारांचे विचार, वेद पुराण, दैदिप्यमान इतिहास, यांची सुस्पष्ट मांडणी करावी, आपल्या धर्माचा, संस्कृतीचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे हे सांगून अनेक वेळा आपल्या सनातन धर्म, प्राचीन संस्कृतीवर आरोप, चिखलफेक होते त्यावेळी कलाकारांनी आपल्या सुसंस्कृत, पारंपरिक, ऐतिहासिक कलेद्वारे उत्तर द्यायलाच पाहिजे असे आवाहन करून निवडणुकीत सद्सदविवेक बुद्धीने १००% मतदान करून आपले कर्तव्य पार पाडण्याचे देखील आवाहन केले. कला संवर्धन व साधकांसाठी संस्कार भारती चे विशेष योगदान असल्याचे सांगितले. व्यासपीठावर अभिनेते योगेश सोमण, संस्कार भारती पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष डॉ.पंडित नंदकिशोर कपोते, सचिव लीना आढाव यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक सायली काणे, सूत्रसंचालन सुनीता बोडस तर लीना आढाव व आसावरी बर्वे यांनी आभार मानले.
या वेळी रांगोळी विधा, नाट्य विधेतर्फे मतदार जागृती पथनाट्य सादरीकरण, संगीत विधा, नृत्य विधा, विविध प्रख्यात चित्रकार या विविध कला प्रकारातील कलावंतांनी अप्रतिम सादरीकरण केले. यावेळी प्रामुख्याने मुकुंद कुलकर्णी, समितीचे उपाध्यक्ष प्रफुल भिष्णूरकर, नरेंद्र आमले, उत्तम साठे, शोभा पवार, सुनीता कुलकर्णी यांचे सह माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचेसह कला क्षेत्रातील अनेकविध मान्यवर उपस्थित होते. कला सादरीकरणात ज्योती कोल्हे, संजय चांदगुडे, सायली काणे,विजय दीक्षित, माळवदे,रमा घारे,रमेश खडबडे, योगेश दीक्षित, रती देशमुख, वैशाली गायकवाड, प्रीती आनंद, ओंकार कुलकर्णी, प्रफुल भिष्णूरकर, धनश्री बोबडे, चिरंतन कुलकर्णी यांचेसह कलाश्री, नटेश्र्वर, नृत्य शारदा कत्थक कला, पद्मनाद, नंदकिशोर कल्चर्ल अकेडेमी, संजय कथक अकेडेमी, कला क्षेत्रम,प्रवाह, कला साधना या नृत्य संस्थांसह, स्वर सुधा, अनाहत, समर्थ, पंचम, सूर ताल या संगीत संस्थांच्या कलाकारांनी आपली कला सादर केली.