बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

0
213
crime

वाकड, दि. 05 (पीसीबी) : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 4) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास औंध रावेत बीआरटी रोडवर ताथावडे येथे करण्यात आली.

व्यंकटेश धर्मा कांबळे (वय 21, रा. वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार वंदू गिरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यंकटेश कांबळे याने बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.