जुगार अड्ड्यावर बावधन पोलिसांची कारवाई चौघांवर गुन्हा दाखल

0
2

बावधन, दि. 30 (पीसीबी) : विनोदे वस्ती वाकड येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बावधन पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 28) सायंकाळी करण्यात आली.

सुग्रीव किसन खैरे (वय 42), खाज्या तुकाराम भंडारे (वय 41), रिया नबीलाल पटेल (वय 41), तानाजी घाटे यांच्या विरोधात तो पुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार ओमप्रकाश कांबळे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोदे वस्ती वाकड येथे चौघेजण तीन पत्त्यांचा जुगार खेळत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर बावधन पोलिसांनी कारवाई करत चौघांवर गुन्हा नोंदवला. त्यांच्याकडून 2900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.