मित्राला समजावून सांगितले नाही म्हणून कोयत्याने वार

0
4

चाकण, दि. 30 (पीसीबी) : किरकोळ कारणावरून तिघांनी मिळून एका सतरा वर्षीय मुलावर कोयत्याने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 28) रात्री नाणेकरवाडी चाकण येथे घडली.

याप्रकरणी सतरा वर्षीय मुलांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओम नाणेकर, रणजीत येरकर, हरीओम नायकवाडे (सर्व रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना रस्त्यात अडवून त्यांना मारहाण केली. फिर्यादी यांचा मित्र आयान शेख याला का समजावून सांगितले नाही, या कारणावरून आरोपींनी मारहाण केली. आरोपींनी फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार केले. चाकण पोलीस तपास करत आहेत.