मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालवली, डॉक्टरांनी दिला हा सल्ला

0
3

अंतरवाली सराटी, दि. 30 (पीसीबी) : मराठा आरक्षण आंदोलनचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका बजवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा समाजातील तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांना निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचे सांगितले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांचे दौरे आणि भेटीगाठी सुरु आहेत. अनेक इच्छूक त्यांच्या भेटीसाठी येत आहेत. सततचे जागरण आणि दगदगीमुळे आता त्यांची प्रकृती खालवली आहे. त्यांच्या अंगात ताप आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. यामुळे ग्लॅलेक्सि हॉस्पिटलच्या पथकाकडून मनोज जरांगे पाटील यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे.

मनोज जरांगे यांची प्रकृती बरी नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण न देणाऱ्या पक्ष आणि उमेदवारांच्या विरोधात ते मैदानात उतरले आहेत. आता त्यांनी 31 तारखेला मराठा, मुस्लिम व दलित समीकरण जुळवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. या बैठकीत विविध धर्माचे धर्मगुरु आहे. हेलिकॉप्टर आणि विमानाने महत्त्वाचे धर्मगुरू येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर मराठा समाज बांधवांनी 31 तारखेला अंतरवाली सराटीत येऊ नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा आणि मुस्लिमांना एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते 31 ऑक्टोबरला अधिकृत फायनल बैठक घेणार आहे. त्या बैठकीनंतर कोण उमेदवार आणि कोणता मतदार संघ यासंदर्भातील अंतिम निर्णय देणार आहोत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे म्हणाले, पुन्हा पुन्हा सांगतो मराठा मुस्लिम झाल्याशिवाय मज्जा नाही. एका जातीवर या राज्यात कोणीच निवडणूक जिंकू शकत नाही.

विधानसभेत दलित, मुस्लिम, मराठा एकत्र आले तर सगळे आमचे निवडून येणार आहेत. कधी चेहरा न बघितलेले शेतकऱ्याचे मुले आमदार असतील. मुसलमान समाजातील मुले तुम्हाला आमदार अन् मंत्री झालेले दिसतील. पण हे सुंदर स्वप्न बघण्यासाठी समीकरण जुळले पाहिजे, दलित, मुस्लिम, मराठयांनी शहाणे होणे गरजेचं आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.