जाब विचारल्याने तरुणाला चौथ्या मजल्यावरून ढकलले

0
138

महाळुंगे, दि. 28 (पीसीबी) : चांगले आणि खरकटे जेवण एकत्र पॅक केल्याचा जाब विचारल्याने एका तरुणाला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 26) रात्री आठ वाजताच्या सुमारास खेड येथे घडली.

धीरज कुंटे असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा केशव हिंगणे (वय 19, रा. जामदार वस्ती, निघोजे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतिश चंदू गायकवाड (वय 34, रा. अकोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अतिश याने दुपारी राहिलेले चांगले जेवण आणि त्याने खाल्लेले खरकटे जेवण एकत्र एकाच पिशवीत पॅक केले. याचा जाब धीरज यांनी आदेश याला विचारला. त्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून अतीश याने धीरज यांना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून ढकलून दिले. यामध्ये धीरज हे गंभीर जखमी झाले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.