मठ मंदिरासाठी नाथपंथीय डवरी समाजाचे मौलिक योगदान

0
4

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) : अत्यंत बिकट स्थितीत जगणाऱ्या डवरी समाजापासून ते अत्यंत श्रीमंत समाजापर्यंत आपण सर्वजण हिंदू आहोत. बिकट स्थितीत असणाऱ्या हिंदूंना चांगल्या स्थितीत आणणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. ज्या परिस्थितीत डवरी समाज राहतो आणि तरीही आपला धर्म टिकवून ठेवतो ती गोष्ट अन्य सर्व हिंदू समाजाने शिकावी अशी आहे. मठ मंदिरे टिकवून ठेवण्यात त्यांचे महत्वाचे योगदान असल्याचे मत मान्यवरांनी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात मांडले.

पिंपरी काळेवाडी येथील श्रीनाथ मंदिरात नाथ संप्रदाय डवरी समाज दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी समरसता गतिविधिचे सामाजिक कार्यकर्ते विलास लांडगे, मुकुंद यदमल, नरेंद्र पेंडसे प्रामुख्याने उपस्थित होते. विलास लांडगे, यदमल यांनी प्रबोधनात्मक संवाद साधला.

आपल्या शहरात असलेली सर्व छोटी छोटी मंदिरे चांगली व्हावीत ही संपूर्ण हिंदू समाजाची जबाबदारी आहे. समाजातील तरुण मुलामुलींना आपण मेडिकल असिस्टंट, ऑफिस असिस्टंट, कॉम्प्युटर ऑपरेटिंग अशी प्रशिक्षणे दिली तर आपली स्थिती सुधारेल असे मत लेखक नरेंद्र पेंडसे यांनी व्यक्त केले. यावेळी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सकल हिंदू म्हणून एकत्रित राहून १००% मतदान करण्याचा संकल्प केला. यशस्वितेसाठी कोष्टी, ललित कासार यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमानंतर दिवाळी फराळ वाटप करण्यात आला.