भोसरी, दि. 25 (पीसीबी) : सदगुरु दत्तनगर या ठिकाणी रेड झोन मध्ये अनधिकृत उभारलेल्या लेबर कॅंप – झालेल्या कामगाराच्या जीवितहानी मधिल दोषींवर योग्य ते गुन्हे दाखल करण्यात यावेत, या ठिकाणी रेड झोन मध्ये रेड झोन मध्ये अनधिकृत रीत्या अदानी कंपनीने लेबर कँप उभारले असून त्या ठिकाणी बांधकाम कामगार सुरक्षा नियमानुसार कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतलेली नाही.
तिथे कामगारांना राहण्यास जागा दिली व तेथे तीन ते चार दिवस आधी बांधलेल्या पाण्याची काँक्रेटची टाकी कोसळल्यामुळे लेबर कॅम्प मधील काही कामगार त्या टाकी खाली चिरडून मृत्त्युमुखी पडले ही दुर्दैवी आणि हलगर्जीपणामुळे घडलेली दुर्घटना आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी प्रसिध्दी पत्रकात केला आहे.
लेबर कॅम्पच्या मालकांवर व ज्या कंट्रॅक्ट कंपनीचा लेबर कॅम्प आहे त्या कंपनीवरती योग्य ते गुन्हे दाखल करावे ही विनंती . व मयत व्यक्तीच्या नातेवाईक यांना योग्य तो न्याय देण्यात यावा, सद्गुरु नगर, भोसरी या परिसरातील रेड झोन मध्ये अनधिकृत रीत्या अदानी कंपनीने लेबर कँप उभारले असून त्या ठिकाणी जी पाण्याची काँक्रेटची टाकी कोसळल्यामुळे लेबर कॅम्प मधील कामगारांची जिवित हानी झाली.
बीट निरीक्षकावरही कारवाई करावी
तर तो परिसर आपल्या पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत व ई क्षत्रिय कार्यालयाचा अंतर्गत येत असून ते अनधिकृत लेबर कॅम्प काढून टाकण्यात यावेत. तसेच या परिसरातील पालिकेचे जे बिट निरीक्षक आहेत त्यांच्या हलगर्जी पणामुळे व त्यानी दुर्लक्ष केल्यामुळे ही कामगारांची जिवितहानी झाली त्यामुळे बीट निरिक्षकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सचिन चिखले यांनी केली आहे.
या दुर्घटनेस जबाबदार धरून तातडीने कारवाई करावी, असे निवेदन पालिका आयुक्त शेखर सिंह व भोसरी पोलिस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सचिन चिखले यांनी दिले आहे.
यावेळी तुषार सोनटक्के (उपविभाग अध्यक्ष), संतोष महाजन, प्रेम पवार, विक्रम भोसले (शाखा अध्यक्ष), अक्षय शिंदे (उप चिटणीस कामगार संघटना) आदी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
सचिन चिखले – मनसेशहरअध्यक्ष