चाकण, दि. 24 (पीसीबी) : हायवाने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार हायवाखाली आला. यामध्ये चिरडला गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 23) दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास आंबेठाण चौक, चाकण येथे घडला.
अविनाश कैलास वर्पे (वय 30, रा. चाकण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश यांच्या पत्नीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हायवा चालक करण अशोक घोगरे (वय 24, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अविनाश वर्पे हे त्यांच्या दुचाकीवरून आंबेठाण चौक चाकण येथून जात होते. त्यांच्या दुचाकीला पाठीमागून हायवा ट्रकने धडक दिली. या अपघातात अविनाश हे हायवाखाली चिरडले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.