श्रीगोंदामध्ये अजित पवारांना मोठा धक्का; ‘या’ बड्या महिला नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

0
3

श्रीगोंदा, दि. 23 (पीसीबी) : भाजपने महायुतीत उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली. पहिली यादी जाहीर होताच राज्यात अनेक भागात महायुतीला धक्के बसले. मतदारसंघात तिकीट न मिळाल्याने तर हा मतदार संघ महायुतीत भाजपला सुटल्याने अनेकांनी आता पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुतीला, अजितदादा गटाला पहिला धक्का बसला आहे. श्रीगोंदा मतदारसंघात भाजपने आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानाराजीने अनुराधा नागवडे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांनी लागलीच निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला सोडचिठ्ठी दिली. आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधले. महायुतीकडून उमेदवारी जाहीर होताच अनेक जण महाविकास आघाडीच्या संपर्कात आले आहेत.

मागील काही दिवसांपासून मातोश्रीवर इन्कमिंग सुरू आहे. माझ्यावर टीका होत आहे की हे घरी बसून काम करत आहेत. संपूर्ण दुनिया माझ्या घरी येत असेल तर याच्यापेक्षा भाग्यवान कोण? असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. माझ्या आजोबांचे एक वाक्य आठवतंय संकटाच्या छाताडावर चालून जा. ज्या लोकांनी आपला पक्ष चोरला चिन्ह चोरलं त्यांनी संकट उभ केल संकटातून कित्येक पटीने शिवसेना मोठी झाली. साजनच खास कौतुक आपण ही हट्ट केला आणि जागा मागितली साजनसाठी, साजनने मला सांगितलं की हा मतदार संघ जिंकला की 25 वर्ष आपल्याकडे मतदार संघाकडे राहील फक्त एकदा मतदार संघ जिंकावा लागेल. ताई आणि दादा साजणीच जबाबदारी माझी तशी तुमचीही जबाबदारी माझी आहे. यामुळे गाफिल राहू नका समोरच शत्रू असा तसा नाही तो साम दाम दंड भेद वापरेल पण तुम्ही मशालीसारखे धगधगते रहा. शिवशाहीचे सरकार परत आणा, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी अनुराधा नागवडे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्या मोठ्या आशेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या होत्या. अजितदादा गटाला श्रीगोंद्याची जागा सुटेल असे त्यांना वाटत होते. या मतदारसंघातून भाजपने उमेदवार जाहीर केल्याने त्यांची निराशा झाली. त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि दादा गटाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी आज 23 ऑक्टोबर रोजी शिवबंधन बांधले. यावेळी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे ही जागा ठाकरे गट लढवणार की शरद पवार गट लढवणार हे अद्याप समोर आले नसले तरी आपण निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले.