श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांचे हस्ते तीर्थ विठ्ठल पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

0
56

आळंदी, दि. 22 (पीसीबी) : भावासुमन प्रकाशन साहित्यकणा फौंडेशन व साहित्याची वारी मित्र मंडळ नाशिक येथे विलास पंचभाई यांचे तीर्थ विठ्ठल या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात झाले. प्रा. यशवंत पाटील गायकवाड ( नाशिक ) अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाट्न झाले. या प्रसंगी मॅजिस्टर वसंत पाटील, संजय गोऱ्हाडे, विलास पंचभाई, संजय आहेरे सुभाष उमरकर नाशिक, ताई कुलकर्णी, सीताताई कुदळे आदी मान्यवर कवी लेखक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, कवी, लेखक यांना संत ज्ञानेश्वर महाराज ओवीचे आणि संत नामदेव, संत तुकाराम महाराज आदी संताच्या वांगमयांचे सारस्वतांच्या जीवनात किती महत्वाचे स्थान आहे. आणि संत वांगमयाचा सखोल अभ्यास केल्यानेच आपली लेखणी अतिशय योग्य ठिकाणी उपयुक्त दिशेने जाऊ शकते याचे महत्व आपल्या भाषणातून कवी लेखकांना पटवून दिले. या पुस्तकाचे उपस्थितांनी स्वागत करीत प्रकाशन सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा मनोगतातून दिल्या.