दुचाकीच्या धडकेत तरुण गंभीर जखमी

0
3

निगडी, दि. 22 (पीसीबी) : भरधाव दुचाकीने एका तरुणाला धडक दिली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 20) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास महापौर मैदानासमोरील सर्विस रोडवर निगडी प्राधिकरण येथे घडला.

प्रसाद नवनाथ पैठणकर (वय 24, रा. यमुनानगर निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद आणि त्यांचे मित्र महापौर मैदान येथे क्रिकेट खेळत होते. दरम्यान त्यांचा बॉल मैदानासमोरील सर्विस रोडवर गेला. तो घेऊन सर्विस रोड ओलांडत असताना प्रसाद यांना एका भरधाव दुचाकीने जोरात धडक दिली. या अपघातात प्रसाद यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.