रहाटणी, दि. 21 (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत (आण्णा) नखाते यांच्या वतीने आयोजित केलेल्या गौरवशाली गणेश महोत्सव घरगुती गणपती सजावट स्पर्धेचा बक्षिस वितरण आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा गुरुवारी सायंकाळी रहाटणी येथे उत्साहात पार पडला.
रहाटणी येथील नखाते पेट्रोल पंपासमोरील मोकळ्या मैदानात आयोजित भव्य सोहळ्यात विजयी स्पर्धकांना मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे, पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे प्रवक्ते अमोल थोरात यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
गौरी गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांकाची सात बक्षिसे देण्यात आली. विद्या किरण दाईवाल, वसंती उल्हास जावासकर, अभय मनोहर गायकवाड, ज्योती गणेश कुदरपाके, शरद गुरुदास सावलानी, प्रणील अनिल बोरकर, निलम श्रीकांत बरगे यांना प्रथम क्रमांकाची ७ EV -bike बक्षिसे देण्यात आली. तर, 11 जणांना द्वितीय क्रमांकाची LED TV बक्षिसे देण्यात आली. तृतीय क्रमांकाची 21, चतुर्थ क्रमांकाची 51, पाचव्या क्रमांकाची 101 बक्षिसे विजेत्या स्पर्धकांना देण्यात आली. तसेच, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
त्याचबरोबर 70 व्या राष्ट्रीय फिल्म अवार्ड विजेता रहाटणीचा सुपुत्र अनंत शिंदे याला राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांच्या हस्ते द बेस्ट व्हॉईसओव्हर इन द हिस्टरी ऑफ नॅशनल अॅवॉर्ड देण्यात आला. याबद्दल चंद्रकांत (आण्णा) नखाते यांच्या वतीने त्याचाही या व्यासपीठावर सन्मान करण्यात आला. तसेच, औंध येथे झालेल्या राज्यस्थरीय कुस्ती स्पर्धेत ओम तानाजी नखाते, साहिल विशाल नखाते, रणजीत हिप्परकर, हर्ष विवेक नखाते यांनी पुणे केसरी किताब पटकिवल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सुमारे तीन हजार नागरिकांची गर्दी होती.










































