खळबळजनक! विधानसभा निवडणुकीपूर्वीचं मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर चार कोटींचे सोने जप्त

0
5

मुंबई, दि. 20 (पीसीबी) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आता प्रचार सभांचा धडाका सुरु होणार आहे. त्याचवेळी निवडणूक आयोग सक्रीय झाला आहे. निवडणुकीत गैरप्रकार टाळण्यासाठी आयोगाने धडक नियोजन केले आहे. उमेदवारांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष असणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यातील सीमेवर तपासणी पथक तयार केले आहे. त्याचवेळी आंतरराज्य सीमेवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. दुसऱ्या राज्यातून अवैध वाहतुकीवर निर्बंध आणले आहे. तसेच सीमा नाक्यावर सीसीटीव्हीही बसवण्यात आले आहे. आता रविवारी विदर्भात मोठी कारवाई झाली आहे. मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर 3 कोटी 91 लाख रुपयेचे सोने जप्त करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर धडक कारवाई करण्यात आली. या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी तपासणी करताना 3 कोटी 91 लाखांचे सोने जप्त केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा २०२४ ची निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागली. निवडणूक आयोगा सक्रीय झाला. प्रशासनाने ठिकाठिकाणी तपासणी नाके तयार केले. तपासणी नाक्यावरुन येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक गाडीवर लक्ष ठेवले जात आहे. संशय येताच तपासणी केली जात आहे. त्याप्रमाणे तपासणी करताना सोने जप्त करण्यात आले आहे. सीमेवरील चौकशी पथक २४ तास लक्ष ठेवत आहे. जप्त केलेले सोने कोणाचे आहे? ते सोने कोठून येत होते? याबाबत अद्याप काहीच माहिती मिळाली नाही. या प्रकरणी चौकशी सुरु करण्यात आली आहे.