मशिन मध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

0
73

चिखली, दि. 19 (पीसीबी) : मशिन मध्ये अडकून झालेल्या अपघातात कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी अकरा वाजता नफी स्टील यार्ड कंपनी, कुदळवाडी चिखली येथे घडली.

मोहनलाल जोखनप्रसाद गौतम (रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. कंपनीचे मालक फैयाज उमर शेख (वय 52), फारुख उमर शेख (वय 58, रा. वानवडी, पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर देवकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या कंपनीत मशिनवर प्रशिक्षित कामगार न ठेवता अकुशल कामगार मोहनलाल गौतम यास ठेवले. त्यामुळे मशिनवर काम करताना मोहनलाल मशीनमध्ये अडकला गेला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.