राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वात आधी आम्ही करु; सुजात आंबेडकरांचा ठाकरेंना इशारा

0
4

वाशिम, दि. 18 (पीसीबी) : मुस्लिमांसाठी फक्त वंचित बहुजन आघाडी लढते, ते म्हणतात आम्ही मोठमोठे स्पीकर लावू, भोंगे लावून त्यावर हनुमान चालिसा वाजवू, मात्र त्याला विरोध करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वात आधी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील, असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी वाशिममध्ये एका सभेत बोलताना केलं. ते वंचितच्या उमेदवार मेघा डोंगरे यांच्या प्रचारासाठी आले होते.

जोपर्यंत मुस्लिमांचे चार-पाच लोक निवडून जात नाहीत तोपर्यंत त्यांचं भलं होणार नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे प्रस्थापित नेते आमचा विकास करू शकणार नाहीत. आमची फक्त एकच मागणी असली पाहिजे की १५ टक्के मुस्लिम समाज महाराष्ट्रात आहे आणि जो पक्ष १५ टक्के त्यांना भागीदारी देईल, १५ टक्के उमेदवारी देईल त्यांनाच मतदान करून आपल्याला विजयी करायचा आहे, असेही वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केलं. विदर्भातील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. वाशीम जिल्ह्यात या दोन्ही युती, आघाडींच्या जोडीला वंचित बहुजन आघाडीही दम लावत असल्याने आत्ताच तिन्ही मतदारसंघांमध्ये तिरंगी सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.

वाशीम जिल्ह्यात २४ हजार २२७ नवमतदाराची नोंद झाली आहे. यामध्ये कारंजात ३ हजार ६६७, वाशीम ७ हजार ८०४ आणि रिसोड मतदारसंघात ८ हजार २४० मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. रिसोडचा विचार करता विजयाचे मताधिक्य हे आठ हजारांपेक्षा नेहमीच कमी राहिले आहे. त्यामुळे वाढलेले मतदान या मतदारसंघात निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. हीच स्थिती वाशीम आणि कारंजातही राहील. बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांना राज्यपाल नियुक्त आमदार करण्यात आले आहे. वाशीम, यवतमाळ, बुलढाणा या तीन जिल्ह्यांसह राज्यातील ४५ मतदारसंघांमध्ये याचा परिणाम होणार असल्याचे राजकीय तज्ज्ञ अंदाज वर्तवत आहेत. विशेष म्हणजे, पोहरादेवीचा विकास, नंगारा भवनचे लोकार्पण या घटनाही प्रभावी ठरणार आहेत. हे सर्व घडत असल्याने बंजारा समाजाची भूमिका काय राहणार याकडे लक्ष लागून आहे. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्याकडून घडावा; दसऱ्यानिमित्त राज ठाकरेंचं जनतेला आवाहन