सोमाटणे फाटा येथून पाच किलो गांजा जप्त; एकास अटक

0
61

तळेगाव, दि. 17 (पीसीबी) : तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोमाटणे फाटा येथून पाच किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 15) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.

अश्फाकअली सज्जादअली शेख (वय 40, रा. गोवंडी वेस्ट) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार उमाकांत नवगिरे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाट्याकडून मुंबई पुणे द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आदित्य हॉटेल समोर एक जण गांजा घेऊन आल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अश्फाकअली शेख याला ताब्यात घेतले. त्याची झेडपी घेतली असता त्याच्याकडे अडीच लाख रुपये किमतीचा पाच किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करत अश्फाकअली याला अटक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.