गुलाबी जॅकेट नाही तर गुजराती गुलामगिरीची झुल…..; अमोल कोल्हेचा अजितदादांवर घणाघात

0
56

सातारा, दि. 16 (पीसीबी) : सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, मेहबूब शेख, बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत. या मेळाव्यात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी दमदार भाषण केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. ‘जनसन्मान यात्रे’वेळी अजित पवार गुलाबी जॅकेट घालतात. त्यावर अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे. अजित दादांचं गुलाबी जॅकेट नाही तर गुजराती गुलामगिरीची झुल आहे, असं अमोल कोल्हे म्हणालेत.

वाई परिसरात शिवप्रेमी आहेत. साडे तीनशे वर्ष किल्ले सिंधुदुर्ग टिकतो. मात्र छत्रपतीचा पुतळा टिकत नाही हे दुर्दैवी आहे. केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले या बाबत टेबल न्यूज म्हणुन सर्वत्र सांगितले जात आहे. आचारसंहितेच्या तोंडावर घोषणा देऊन चालत नाही, असं अमोल कोल्हे म्हणालेत. उठा उठा दिवाळी निवडणूक आली आणि गद्दारांना घरी पाठवण्याची वेळ झाली, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनीही या मेळाव्यात भाषण केलं. नेते कुठेही गेले तरी जनता शरद पवार यांच्यासोबत आहे. पक्ष फोडायची नाही तर पक्ष चोरायची पध्दत महाराष्ट्रात सुरु झाली आहे. सर्वच प्रकल्प गुजरातला न्यायचे असतील तर मते देखील गुजरातला मागा.. अजित दादांविषयी आपण कधीच बोलत नाही. पण जाणाऱ्यांचा एकच नारा तुरुंगा पेक्षा भाजप बरा आहे… अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेवर बोलू नये. कारण दादांनी आपल्या बहिणीचा विचार केला नाही, अशा शब्दात मेहबूब शेख यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.