तरुणीवर लैंगिक अत्‍याचार; तरुणावर गुन्‍हा

0
76

पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी)

लैंगिक अत्‍याचारानंतर गरोदर राहिलेल्‍या तरुणीस गर्भपातासाठी डिहायड्रेशनच्‍या गोळ्या दिल्‍या. तसेच लग्‍नासही नकार दिला. ही घटना १८ नोव्‍हेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत मारूंजी येथे घडली.

अलोक भिमसिंग शुक्‍ला (वय २८, रा. पी.जी, हॉटेल सनराइजजवळ, मारूंजी, ता. मुळशी, जि. पुणे. मूळगाव लखनौ, उत्‍तरप्रदेश) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत २३ वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी आणि पिडित तरुणीची ओळख आहे. आरोपीने पिडित तरुणीला प्रेमाच्‍या जाळ्यात अडकवून तिला लग्‍नाचे अमिष दाखविले. त्‍यानंतर तिच्‍यावर वेळोवेळी लैंगिक अत्‍याचार केला. यातून ती तरुणी गरोदर राहिली असता आरोपीने तिचा गर्भपात होण्‍यासाठी डिहायड्रेशनच्‍या गोळ्या दिल्‍या. तसेच लग्‍नास नकार देऊन फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.