काग्रेस विधानसभा इच्छुकांच्या मुलाखतीत, चिंचवडमधून कैलास कदम इच्छुक

0
12

पिंपरी,दि. 15 (पीसीबी)
विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत यामध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी घेत सर्व मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र राज्याच्या सर्वच विधानसभा क्षेत्रात ज्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज केला होता त्या सर्वांची निरीक्षकांच्या उपस्थितीत मुलाखती पार पडल्या. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड व भोसरी मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवारांची पुणे काँग्रेस भवन येथे निरीक्षक आमदार यशोमती ठाकूर यांनी मुलाखती घेतल्या.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम, पुणे शहराचे अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, पुणे लोकसभा निरीक्षक अजित दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

चिंचवड ( २०५) या मतदारसंघातून
डॉ कैलास कदम, संदेश नवले ,तुकाराम भोंडवे , प्रियंका मलशेट्टी कदम ,सज्जी वर्की ,सायली नढे ,शशी नायर, राजन नायर, भरत वाल्हेकर

पिंपरी ( २०६) मतदार संघातून
विश्वनाथ जगताप , मनोज कांबळे, बाबासाहेब बनसोडे ,गौतम आरकडे, शामला सोनवणे,ज्योती गायकवाड, डॉ. मनीषा गरुड ,चंद्रकांत लोंढे,पंकज बगाडे ,अर्चना राऊत.

भोसरी ( 207) मतदार संघातून
सोमनाथ शेळके ,विठ्ठल शिंदे ,स्मिता पवार

या सर्व इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. पिंपरी चिंचवड मध्ये शहर काँग्रेसचे तळागाळात काम आहे व त्यामुळे काँग्रेस पक्षातील सर्वसामान्य कुटुंबातील कोणत्याही निष्ठावंत सैनिकास एकमताने उमेदवारी द्यावी अशी पक्षश्रेष्ठींना साद घालण्यात आली.

काँग्रेस पक्षाचे मतदार पिंपरी चिंचवड शहरांमध्ये तिन्ही मतदारसंघात भरपूर प्रमाणात आहेत याचा निश्चित महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. बूथ स्तरावरची पक्षाची बांधणी अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहे, त्यामुळे पक्षश्रेष्ठी जो मतदार संघ व उमेदवार देईल त्या उमेदवारास एक दिलाने काम करून निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्ते दिवस रात्र काम करतील असे आश्वासन शहराध्यक्षांच्या वतीने निरीक्षकांना देण्यात आले.