दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा

0
70

हिंजवडी, दि. 15 (पीसीबी)

बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सोमवारी (दि. 14) हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तवाडी येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली.

याप्रकरणी 30 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार सोनाली माने यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे दारू विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. महिलेच्या ताब्यातून दहा हजार 500 रुपये किमतीची 105 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.