भावी पत्नीला बोलतो म्हणून तरुणास मारहाण

0
102

भोसरी,  दि. 15 (पीसीबी)

एका व्यक्तीने त्याच्या भावी पत्नीला फोनवर बोलणाऱ्या तरुणाला मारहाण केली. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 13) रात्री अकरा वाजताच्या सुमारास मोशी येथे घडली.

सुदर्शन बाबुराव काळवे (वय 33, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल भीमराव पारवे (वय 34, रा. दापोडी गावठाण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल पारवे हा वकील आहे. त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत फिर्यादी सुदर्शन काळवे हे फोनवर बोलत होते. त्याचा राग आल्याने विशाल याने सुदर्शन यांना शिवीगाळ केली. मी वकील आहे. तुला कशात तरी अडकवतो, अशी धमकी देऊन सुदर्शन यांच्या डोळ्यात चटणी टाकून हेल्मेटने मारहाण केली. यामध्ये सुदर्शन यांना दुखापत झाली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.