गाडीवर फटाका फोडल्याच्या कारणावरून तरुणास मारहाण

0
86
crime

वाकड,  दि. 15 (पीसीबी)

गाडीवर फटाका फोडल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 12) रात्री नखाते वस्ती रहाटणी येथे घडली.

शुभम मारुती नागरे (वय 22, रा. नखाते वस्ती, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ त्रिभुवन (वय 24), साहिल त्रिभुवन (वय 22) आणि दोन अनोळखी इसम (सर्व रा. नखाते वस्ती, रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धार्थ याच्या गाडीवर फटाका फोडल्याचा राग आल्याने त्याने त्याच्या साथीदारांसह येऊन फिर्यादी शुभम यांना लाकडी बांबू आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ केली. तसेच बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.